हातकणंगले / प्रतिनिधी
बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची आरासही कल्पकतेने केली जाते. पारंपरिक आरास पद्धती बरोबरच काहीतरी नवं तयार करण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातो. बाप्पाच्या आरासातून सामाजिक संदेश दिला जातो तर संस्कृतीचं जतनही करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा लॉकडाऊनच्या काळातही तरुणांमधील ही सर्जनशीलता कमी झालेली नाही. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शिवसैनिक संदीप मिरजे यांनी 'शिवसेना भवन'चा अप्रतिम देखावा घरामध्ये साकारलेला आहे. त्याची दखल शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेऊन फेसबुक पेजद्वारे कौतुक केले आहे.
कोरोनामुळे सामुहिक संसर्गाच्या भितीमुळे प्रत्येक सण उत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने कोणतेच सण उत्साहाने साजरे करता आले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंही यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरे करत आहेत. मात्र, समाजात नवचैतन्य भरण्यासाठी बाप्पाचं आगमन झालंय, त्यामुळे त्याचं स्वागत आणि त्यांची आरास झाली पाहिजे त्यामुळे संदीप ने घरातच 'शिवसेना भवन' उभारण्याची संकल्पना साकारली आहे. त्याने आपल्या घरातील शिवसेना भवनच्या आरासचे व्हिडीओ रेकॉर्डींग सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याची दखल शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन त्यांनी या पोस्टला फेसबूक पेजवर लाईक करून सोशल मीडियावर द्वारे त्याचे कौतुक केले आहे.
फोटो
हेरले येथील संदिप मिरजे याने घरी बाप्पांची आरास शिवसेना भवनची प्रतिकृती उभारून केली.