प्रतिनिधी:- प्रमोद झिले,हिंगणघाट वर्धा
जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात एका टोकावर वसलेले कोल्ही (खेकडी) हे गाव विकासापासून सदैव दुर्लक्षित असून गावालगत वसलेल्या पारधी समाजाच्या वस्तीत राहत असलेल्या सीमा राजहंस भोसले वय १४ व लक्ष्मी राजहंस भोसले वय १३ या आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या दोन बहिणी राहतात. यात अपंग आजी व आजोबा यांचा दोघींचा सांभाळ करतात की या चिमुकल्या मुली कष्ट करून त्यांचा सांभाळ करतात हाच प्रश्न आहे. चार वर्षांपूर्वी सीमा व लक्ष्मी यांच्या वडिलांनी परस्थिती ला कंटाळून आत्महत्या केली वडीलाच्या आत्महत्येनंतर दोन वर्षापूर्वी आईने देखील आत्महत्या केली. दोन्ही मुली आता आपल्या आजी आजोबा सोबत ताटवे लावलेल्या कुडाच्या घरात राहतात, कंट्रोलच्या धान्यात जगतात मात्र आता शिक्षण कोण व कसे घेणार या पेचात पडलेल्या दोघी बहिणी पैकी मोठी सीमा ने ठरवले की ती मोल मजुरी करेल आणि तिची लहान बहीण लक्ष्मी शिक्षण घेईल. आता आपल्या आजी आजोबांचे पालन पोषण करून बहिणीच्या शिक्षणाचा वसा उचललेल्या सीमाला मात्र आपले शिक्षण सोडाव लागत आहे. यात आता सीमा ला देखील शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा परिषद शाळा कोल्ही येथील शिक्षक परमेश्वर नरवटे व शिक्षिका दिपाली सावंत यांनी प्रयत्न करणे सुरू केले आहे मात्र अजून पर्यन्त कोणीही देवदूत लक्ष्मि आणि सीमा यांच्या जीवनात आलेला नाही.