कंदलगाव ता. २ ,
लॉक डाऊन काळात भटक्या जनावरांना शहरात मुबलक अन्न मिळत नसल्याने जनावरांनी हिरव्या चाऱ्याच्या शोधात सध्या उपनगरे गाठली आहेत. त्यामुळे परिसरात भटक्या जनावरांची संख्या वाढत असून मुख्य रस्ते, चौकात वाहतूकीची कोंढी होत आहे.
अनेक वेळा आशा जनावरांना खाऊ घातल्याने गल्ली, बोळातही त्यांचे कळप दिसत आहेत. यामध्ये गाई आणि घोड्यांचा समावेश असून हि पाळीव जनावरे असल्याचे नागरीकांतून बोलण्यात येते.
सध्या लॉक डाऊन शिथील असल्याने वाहनांची गर्दि वाढत आहे आशा वेळी या भटक्या जनावरांचे ठाण रस्त्यावर असल्याने वाहतूकीची कोंढी होत आहे. संबधीत महापालिका विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.
- रस्त्यावर भटक्या जनावरांचे कळप वाढत आहेत. काही वेळा हि जनावरे सैरवैर रस्त्याने पळत सुटतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते .
शिवाजी माने
-नागरीक
फोटो - सुभाषनगर चौकात रस्त्याच्या मधोमध थांबलेला भटक्या जनावरांचा कळप .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )