सैनिक टाकळी प्रतिनिधी
वारणा, दुधगंगा. कृष्णा .पंचगंगा नद्यांच्या धरण क्षेत्रामध्ये अति वृष्टी होत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहेत या पार्श्वभूमीवर गतवर्षीचा महापुराचा अनुभव घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये एन डी आर एफ ची पथके दाखल झाली आहेत. त्यामधील एक तुकडी सैनिक टाकळी येथे तैनात करण्यात आली आहे येथील स्वराज अकादमी येथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली असून या ठिकाणाहून राजापूर राजापूर वाडी. खिद्रापूर , दानवाड ,बस्तवाड या गावांच्या पूरपरिस्थिती वरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेतला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास खबरदारीच्या सुचना दिल्या होत्या .दरम्यान बावीस जवानांसह एन डी आर एफ चे पथक बोटी, लाईफ जॅकेट ,दोरखंड इत्यादी रेस्क्यू ऑपरेशन चे साहित्य घेऊन महापुरा शी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. राजापूर खिद्रापूर राजापूर वाडी या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन या पथकाने तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रेस्क्यू ऑपरेशन करत असताना कोरोना महामारीचा प्रसार होऊ नये याची दखल घेतली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली . गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असल्याने लोकांच्या मनातील भीती कमी झाली असून वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे