कंदलगाव ता.५,
काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाचगाव परिसरातील ओढे तुडूंब भरून वाहत असून ओढ्याच्या पात्रालगत असणाऱ्या अनेक रहिवाशी भागात पाणी शिरल्याने नागरीकांची तारांबळ होत होती.
पाचगाव परिसरातील विठ्ठल -रुक्मिनी नगर, पंचशील कॉलनी येथील घरामध्ये पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. जिवन ज्योती रेस्क्यूटिमचे संदिप गायकवाड व विनायक लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरातील पाणी बाहेर काढले. सकाळी अकरा वाजले पासून सुमारे पाच वाजेपर्यंत परिसरातील नाले, गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता.
फोटो - पाचगाव परिसरातील कॉलनीत तुंबलेल्या पाण्याला वाट करताना संदिप गायकवाड व विनायक लांडगे .