गांधीनगर : प्रतिनिधी
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वळीवडे (ता. करवीर) येथे निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती व होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.#
वळीवडे येथील कोरोना बाधित रुग्णसंख्येने साठी ओलांडली असून ग्रामस्थ चिंताग्रस्त बनले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून मिळालेल्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप प्रभाग क्रमांक दोनमध्ये ग्रामपंचायत सदस्य सौ. उज्वला गणपती पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. जय शिवराय तरुण मंडळाचे कार्यकर्तेही या सर्व उपक्रमात सहभागी झाले. जय माने, आकाश पोवार, संदीप जोंग, सचिन गडकरी, प्रवीण कोरवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो
.................
वळीवडे येथे कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य सौ. उज्वला गणपती पोवार.