हेरले / प्रतिनिधी
दि १० /८ /२०
हातकणंगले तालुक्यातील चोकाकच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर सुकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा सचिन पाटील होत्या.
चोकाकच्या ग्रामपंचायतीवर आघाडी नेते सुकुमार बुकशेट,अविनाश बनगे, महादेव चव्हाण,बाळासो कदम ,यांच्या जखुबाई देवी ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे.आघाडी अंतर्गत ठरल्या प्रमाणे उपसरपंच पदाचा सुकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.
महावीर पाटील यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ग्रामसेवक अनुपमा सिदनाळे यांनी त्यांची बिनविरोध निवड केली.या सभेस पोलीस पाटील सचिन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे,विकास चव्हाण,योगेश चोकाककर,लता पाटील,मनीषा कुंभार,सुवर्णा सुतार,अर्चना हलसवडे,स्मिता सरदार,उज्वला जाधव उपस्थित होते.