हेरले / प्रतिनिधी
दि.१६/८/२०
प्रशांत तोडकर
हेरले परिसरातील ग्रामपंचायती पदाधिकारी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्स ठेवून ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.
हेरले (ता हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते व ध्वजपूजन उपसरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण तलाठी, सर्कल सर्व ग्रामपंचायत सदस्य,आशावर्कर उपस्थितीत होते.
श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटी येथे चेअरमन उदय चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सभापती तथा संचालक राजेश पाटील ,स्वप्नील कोळेकर, सुनील खोचगे, अशोक मुंडे,रमेश कदम,सेक्रेटरी दशरथ खोत,रवींद्र मिरजे,गुरू नाईक,अक्षय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
चोकाक (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच महावीर पाटील यांच्या हस्ते तर चावडी समोर पोलीस पाटील सचिन कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला . यावेळी सरपंच मनीषा सचिन पाटील ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे तलाठी नितीन जाधव कृषिसहायक सचिन अलमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्या तसेच मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थितीत होते.
माले (ता हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीचे व मराठी शाळा येथील सरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपसरपंच रोहिणी भरत गावडे ,माजी उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामसेवक सुनिल खांडेकर पोलिस पाटील तलाठी शाळेतील शिक्षक आंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मौजे वडगावमध्ये ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यालय व संस्थामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यामध्ये मुख्य झेंडा चौक येथील ध्वजारोहण सरपंच काशीनाथ कांबळे ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण उपसरपंच सुभाष आकिवाटे यांच्या हस्ते पार पडले. विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे संदिप मगदूम , दत्त सोसायटीतील राजाराम आकिवाटे , बौद्ध समाज येथील ग्रामसेवक विठठल कांबळे , कामधेनू दुध संस्थेचे महमंद हजारी आशा मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.