कंदलगाव - प्रकाश पाटील
सोमवार पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अखेर कंदलगावकरांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम दिला. गावची जीवनदायीनी म्हणून ज्या तलावाकडे शेतकऱ्यांची आशा असते तो तलाव अखेर भरला.
कंदलगाव सह गो. शिरगाव परिसरातील शेतकऱ्यांना गावचा तलाव आधारवड असल्याने तो प्रत्येक वर्षी ओसंडून भरणे गरजेचे असते. या तलावातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य असल्याने तलावातून सोडलेल्या पाण्यामुळे ऊस, गहू, भाजीपाला, फुलशेती पिकवली जाते.
१९८४ साली पूर्ण झालेल्या तलावातून एकून १३८४ एकर शेतीसाठी पाणीपूरवठा होत असून कंदलगावसाठी पेयजल योजनेतून पिण्यासाठी पाणीपूरवठाही होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तलाव भरणे गरजेचे असते. तलाव पूर्ण भरल्याने तलावाची पाणी पातळी ४४.५o मीटर वर पोहचली आहे.आज सायंकाळी तलाव भरून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत होते.
तलावाची माहिती - कंदलगाव तलावाचे एकून पाणलोट क्षेत्र ४.९२चौ.कि.मी. असून एकून पाणीसाठा १.७१द.ल.घ.मी.आहे, तलावातील उपयुक्त पाणीसाठा १.६६ द.ल.घ.मी.आहे.एकून लाभक्षेत्र ५६० हेक्टर असून लागवडी लायक क्षेत्र ४४८ हेक्टर आहे.
फोटो - सोमवार पासून कोळसणाऱ्या संततधार पावसामुळे कंदलगाव तलाव भरून वाहत आहे .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )