Thursday, 13 August 2020

mh9 NEWS

पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योती क्षीरसागर प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची - तासगांव,सांगली यांना केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर

हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

   पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योती क्षीरसागर प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची - तासगांव,सांगली यांना केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर हे केंद्रिय गृहमंत्री विशेष पदक त्यांना जाहीर केले आहे. अशी माहिती त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिली आहे.
      सन २०११ मध्ये बीड जिल्हयातील आष्टी पोलीस ठाणे हद्दितील केरुळ या गावी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन अतिशय संवेदनशिल खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये बाळू ऊर्फ रविंद्र खाकाल यांचा तलवारीने वार करुन खुन केला होता. खाकाल यांच्यावर एकूण २९ वार केले
होते. यावरुन आष्टी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४९/११ भा.द.वि. कलम १४७, १४८, १०९, २१२, २०१,
३०७, १२० (ब), ३०२ अन्वये गुन्हा दाखल होता,सदरच्या गुन्हयाचे स्वरुप गंभीर व संवेदनशिल असल्याने तात्कालिन उपविभागीय पोलीस
अधिकारी गेवराई श्रीमती ज्योती क्षीरसागर यांना सदरच्या गुन्हयाचा तपास वर्ग करण्यात आला,जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था व सदरचा गुन्हा हा देखील अतिशय क्लिष्ट व किचकट असताना
सुध्दा त्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा आधार घेउन यातील १७ आरोपींना अटक करुन,त्यांच्याविरुध्द परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक सबळ पुरावा जमा करुन त्यांच्याविरोधात मुदतीत दोषारोपपत्र अतिरीक्त सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
      २०१२ ते २०१९ या कालावधीच्या न्यायालयीन सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यांनी राजकीय दृष्टया अतिशय संवेदनशिल गुन्हयाचा कौशल्याने तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना शिक्षा मिळवून दिली. त्यांनी यापुर्वी अनेक गंभीर गुन्हयांचा तपास केलाअसल्याने त्यांना केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण व अपराध सिध्दीबाबतचे
पदक (UNION HOME MINISTERS MEDAL FOR EXCELLENCE IN
INVESTIGATION) जाहीर झाले आहे.
       पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर या कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव या गावच्या कन्या असून,त्यांनी यापूर्वी नगर, बीड, सी.आय.डी अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरित्या सेवा बजावलेली आहे. सध्या
त्या पोलीस प्रशिक्षणकेंद्र,तुरची-तासगांव, सांगली या ठिकाणी प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :