सैनिक टाकळी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी सन 2020 21 साठी ची वार्षिक नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण वार्षिक वर्गणी आरटीजीएस अथवा एन एफ टी ई द्वारे स्वीकारली जावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केली आहे. कोरोना चा समूह संसर्ग वाढत असताना लोकांचा कमीतकमी संपर्क कसा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांची फी अनेक शाळांंनी एन ई एफ टी द्वारे भरणा केली होती. याच धरतीवरती यावर्षी शाळांची वार्षिक नोंदणी शुल्क देखील ऑनलाईनच जमा करून घ्यावी. दरम्यान विभागीय मंडळाच्या एका परिपत्रकाद्वारे नोंदणी शुल्क विभागीय मंडळाच्या चलनाद्वारे बँकेत जमा करण्याची सूचना दिलेली आहे .सदर नोंदणी दहा ऑगस्ट पर्यंत विनाविलंब करण्याचे आहे .