कंदलगाव ता. १५ ,
आर.के.नगर येथील दे.भ. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल मध्ये चार महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता परिसरातील व परिसरा बाहेरील कोरोना रूग्ण,कॉरन्टाईन व्यक्ति यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जीवन ज्योती रेस्क्यूच्या जवानांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.सतिश घाळी होते. महादेव पोवार, व्ही.एम.महाजन, डॉ. सचिन आजगेकर, मुख्याध्यापक आर.बी.पाटील, पर्यवेक्षक बी.वाय.परकाळे यांचे सह सर्व शिक्षक उपस्थित होते.
१५ ऑगष्ट निमित्त्य ठेवलेल्या या कार्यक्रमात संदिप गायकवाड, सुनिल जाधव,विनायक लांडगे, निहारिका राऊत, स्नेहल वड्ड, रामकुमार शर्मा, प्रांजल गायकवाड, श्रृती गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो -रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे कोरोना योध्दा सत्कारा वेळी हायस्कूलचे सचिव डॉ. सतिश घाळी, आर.बी. पाटील व इतर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )