सैनिक टाकळी प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज कणेरी यांच्या सहकार्यातून बेंगलोर येथील डॉक्टरांनी तयार केलेले इम्मुनिटी बूस्टर चे वाटप येथील श्रीराम सोयाबीन खरेदी विक्री संघ व हरिभाऊ प्रेमी ग्रूप यांच्या विद्यमाने करण्यात आले .गावातील सुमारे आठशे नागरिकांनी याचा लाभ घेतला . यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती हरिचंद्र पाटील म्हणाले कोरोना वरती कोणतेही औषध नसले तरी आपली प्रतिकारशक्ती वाढवल्यास या रोगापासून आपण दूर राहू शकतो .पाटील यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपक्रमा बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील, वैद्य आनंदराव पाटील, विजय पाटील, अरुण पाटील, बंडू शिरहट्टी, संजय पाटील श्रीनिवास पाटील अविनाश मुगदूम किरण पाटील, महेश पाटील, संजय घेवडे, महेश पाटील व हरिभाऊ ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते