सैनिक टाकळी प्रतिनिधी.
गतवर्षी आलेल्या महापुराचा तडाखा शिरोळ तालुक्यातील अनेक गावाना बसला . अनेकांची घरे उध्वस्त झाली. घर पडझडीने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले.त्यांची घरे उभारणी करण्याचा प्रयत्न करत असताना सलमान खान आणि एलान फौडेशनने खिद्रापूर गावाला दत्तक घेऊन ७० घरांचे बांधकाम करून देण्याची केलेली संकल्पना ही गोरगरिबांना तारणारी असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
खिद्रापूर ता.शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी करण्यासाठी एलान फौडेशन दिल्ली व अभिनेते सलमान खान यांनी घेतलेल्या70 घरांच्या आज सोमवारी पायाभरणी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री डॉ. पाटील -यड्रावकर बोलत होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई,तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे-धुमाळ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके,पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे,पंचायत समिती सभापती सौ.कविता चौगुले,सरपंच हैदरखान मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या समन्वयामुळे संभाव्य महापुराचा धोका टळला आहे. काही अंशी दिलासा मिळाला आहे. अशातच कोरोणाच्या आपत्तीचा सामना करत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचे वापर करून कोरोणाचा धोका टाळावा.सामाजिक बांधिलकी जोपासत सलमान खान आणि फौंडेशनने गावाला दत्तक घेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात बोलताना एलान फौंडेशचे आकाश कपूर म्हणाले सलमान खान आणि आमच्या फौंडेशनने दत्तक घेतलेल्या घरांचे लवकरच बांधकाम पूर्ण करून ग्रामस्थांच्या हक्काचे घर निर्माण करून देणार असल्याचे सांगितले
यावेळी प्रतीक चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत मियाखान मोकाशी.प्रास्ताविक संतोष जुगळे यांनी केले तर आभार ग्राम विकास अधिकारी म्हालिंग अकीवाटे यांनी मानले.
यावेळी उपसरपंच ललिता काळे,पोलीस पाटील दिपाली पाटील,नगरसेवक जवाहर पाटील,रविकांत कारदगे,हिदायतुला मुजावर,कॉन्ट्रॅक्टर इलियास पटेल
मंडल अधिकारी विनायक माने तलाठी सुनील बाजारी,पंचायत समिती चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.