Sunday, 2 August 2020

mh9 NEWS

विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या - - पांडूरंग विद्यालयातील ऑनलाइन उपक्रम

*
उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे 

उदगीर, तालुक्यातील पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील  कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शनातून सांगितलेल्या कृतीनुसार जाड पुठ्ठा(खपट) ,कागद, रंग,ब्रश,फेविकॉल,कैंची,उलनचा दोरा,धान्य, मोरपीस, झाडांची पाने,बिया,तुळशी पासून बनलेल्या माळेच्या मणी ईत्यादी साधनांचा वापर करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीने व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जगातील नात्यामध्ये बहीण भावाचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असते. या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला जीवनभर तिचे रक्षण व 
मदत करण्याचे वचन देत असतो.रक्षाबंधनाच्या निमित्ताने  पर्यावरणपूरक बनविलेल्या या राख्या तुटल्यानंतर मातीत अथवा कुंडीत टाकल्यास त्यातून सुंदर-फुलझाडाचे किंवा फळझाडांचे रोपटे बनतील.
निश्चितच या पर्यावरणपूरक राख्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि त्यातूनच पर्यावरणाची शोभा वाढेल.याच उद्देशाने या राख्या बनविल्या आहेत.राख्या बनविलेल्या विद्यार्थ्यांची नावे:- कांबळे प्रज्ञा अण्णाराव,केसगीरे सुदर्शन परशुराम, केसगीरे काशीनाथ परशुराम,सुरनर ज्ञानेश्वरी वामन,मोरे लक्ष्मी माधव, सुरनर स्वाती गणपत,सुरनर शिवराज नारायण, मामडगे सायली विठ्ठल, हाके राधा दयानंद,कुंजटवाड ज्ञानेश्वर रमाकांत,सुरनर तुकाराम जनार्दन, चलवाड निकिता बालाजी,कुंजटवाड अस्मिता रमाकांत आशा अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराच्या पर्यावरणपूरक सुंदर राख्या बनविलेल्या पाहून विद्यालयाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे साहेब सचिव विनायकराव बेंबडे साहेब,पंचायत समिती,उदगीरचे माजी  उपसभापती रामदास बेंबडे साहेब, व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील माता-पालक यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून गोड कौतुक करून अभिनंदन केले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :