प्रतिनिधी सतिश लोहार
शिरदवाड ता . शिरोळ येथील स्वातंत्र्य सैनिक कै . हिंदुराव सिताराम देशमुख-पाटील यांच्या स्मरणार्थ अॅडव्होकेट श्री बाजीराव हिंदुराव देशमुख-पाटील यांच्याकडून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात Covid-19 कोरोना आजार होऊ नये याकरीता मौजे शिरदवाड येथील ग्रामस्थांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कंम्फोरा १एम होमीओपॅथीक या गोळ्यांचे वाटप केले . जवळपास पाचशे कुटुंबाना त्याचे वाटप करण्यात आले, या कोरोना कालावधीत अशा समाज कार्याची गरज आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले , शिरदवाड गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या गोळ्यांचे वाटप केल्याचे अॅडव्होकेट पाटील यांनी सांगितले ,या सामाजिक कार्यासाठी अॅडव्होकेट बी. एच. देशमुख - पाटील यांचे आभार सरपंच अक्षदा कांबळे यांनी मानले, यावेळी उपसरपंच मगदुम , अॅडव्होकेट ऋतुराज देशमुख - पाटील,सत्यराज देशमुख -पाटील , राजेंद्र देशमुख , ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील व इतर मान्यवर नागरीक उपस्थित होते .