कोल्हापूर प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेश उत्सव-२०२० कोल्हापूर महानगरपालिका आयोजित या उपक्रमास सर्वांनी प्रतिसाद देऊया...! या उपक्रमाला अंतर्गत पॅव्हेलीयन ग्राउंड, कसबा बावडा येथे कोल्हापूर महानगरपालिकाचे शहर उपअभियंता हर्षदीप घाटगे , तेजस घोरपडे, राजू कदम, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील,आरोग्यरक्षक मनोज कुरणे,केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील, राजाराम कांबळे सर,चंद्रकांत कुंभार सर,संपत कांबळे, राजू पिसाळ,उदय तावडे,प्रकाश कांबळे,रमेश शिंगे,आरोग्यसेविका वंदना बनकर,आदींच्या सहकार्याने गणेश मूर्तींचे व गौरी- गणपतीच्या निर्माल्यांचे विसर्जन करण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी मा एस के यादव यांनी आवाहन केल्याप्रमाणे मार्फत सोशल डिस्टन्स नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यावरणपूरक जलकुंभ मध्ये विसर्जन करून महानगरपालिकाकडून आरोग्य विभागाने पुरविण्यात आलेल्या डंपर मध्ये सुरक्षित ठेवून इराणी खान कोल्हापूरकडे पाठवण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर जलकुंडा मध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी या वर्षी कोरोनाकाळींन परिस्थितीत काळजी व सुव्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी प्रशासनाने सर्वप्रकारची यंत्रणा राबविण्यात आली होती.यावर्षी प्रथमच प्रशासनाने कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक शाळेतील 243 शिक्षकांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या होत्या.
काटेकोरपणे नियोजन केल्याबद्द कसबा बावडा परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे यांनी आनंद व्यक्त केला.