शिरोळ प्रतिनिधी
*
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मसुद्यातील दुरुस्तीबाबत व जुन्या पेन्शन योजनेबाबत सांस्कृतिक व आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांना निवेदन शिक्षक सेना कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष अरुण मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले , निवेदन देताना शिक्षक सेनेचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद कांबळे सर यांनी शिक्षकांची प्रश्ने, समस्या मांडल्या , जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर , तालुका उपाध्यक्ष अरुण भगत सर, जिल्हा कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले सर यांनी जुन्या पेन्शन संदर्भातील आपली मते व्यक्त केली व त्यावर चर्चा करण्यात आली, यावेळी हातकणगंले तालुका अध्यक्ष गजानन लवटे सर ,इंचलकरंजी शहर कार्याअध्यक्ष राहुल रजपुत सर , इतर शिक्षक सैनिक मान्यवर उपस्थित होते .