एस. एम. वाघमोडे
गांधीनगर प्रतिनिधी
महिलांसाठी अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वाने सर्वोत्कृष्ट राज्यकारभार चालवीत संपूर्ण जगात आदर्श निर्माण केलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रामध्ये समाजाच्या उत्कर्षाचे सिक्रेट लपलेले आहे असे प्रतिपादन पत्रकार महादेव वाघमोडे यांनी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले. याच वेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन काळात मातब्बर विरोधकांना मुत्सद्दी राजकारणात द्वारे कशी मात दिली याचे स्पष्टीकरण दिले तसेच फक्त स्वतःच्या राज्यातील जनतेचा आणि विशिष्ट समुदायाचा विचार न करता संपूर्ण भारतभर रयतेसाठी भरीव कार्य करीत वेगळा आदर्श निर्माण केला. त्यामुळे विस्तारवादी राजकर्त्यांच्या अन्याय अत्याचाराने त्रस्त रयतेला अहिल्यादेवी यांचा मोठा आधार होता. त्यामुळे अशा कर्तुत्ववान स्त्रीच्या चरित्राचे अनुकरण केल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक प्रगती सहज साध्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक गणपती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले तर आभार प्रदर्शन यशवंत खिलारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रासपचे तालुका संपर्कप्रमुख कृष्णात रेवडे यांनी केले. यावेळी म्हाळु पुजारी, पंडित पुजारी, विक्रम, पुजारी, संतोष रेवडे, आनंदा रेवडे ,शिवाजी रेवडे, विशाल पुजारी, करशीद्ध रेवडे ,शिवाजी वाघमोडे, अक्षय पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
गडमुडशिंगी तालुका करवीर येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करताना गणपती पुजारी, यशवंत खिलारी, कृष्णात रेवडे व इतर