पट्टणकोडोली : ( साईनाथ आवटे )पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे कणेरी मठाचे अधिपती श्री. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष आण्णासो देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून सध्या सर्वत्र पसरत असलेल्या कोरोना आजारावर मात करण्यासाठी व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणेसाठी बुस्टर डोस मोफत देणेत येणार आहे. गावातील जास्तीत जास्त लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून व मास्कचा वापर करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष देसाई यांनी केले आहे. तरी सर्वानी आपल्या सोबत येतेवेळी सीलबंद शुद्ध 1 लिटर पाण्याची बाटली घेऊन येणेचे आहे. शेतकरी विकास सेवा सोसायटी पट्टण कोडोली येथे उद्या बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून मोफत देणेत येणार आहे.