उदगीर प्रतिनिधी गणेश मुंडे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद उदगीर तालुका अध्यक्ष तातेराव मुंडे व पदाधिकारी यांनीअन्नत्याग आंदोलन केले.
*शासनाने 10 जुलै रोजी अधिसूचना काढून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणारी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा अधिकार काढून घेतला आहे .ही अधिसूचना रद्द करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद 10 ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी आंदोलनास सज्ज झाली आहे .या *घरी राहूनअन्नत्याग आंदोलनात*
शालेय शिक्षण विभागात सेवे पश्चात मिळणारी पेन्शन कायमस्वरूपी नाकारली जाणार आहे .पण महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती अधिनियम 1977 चे कलम 4(1 )कलम 16( 2अ )मधील तरतुदीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने 2005 पासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची पेन्शन काढून घेता येणार नाही राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत या सुधारणेचा तीव्र निषेध व्यक्त करून तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार दोन टप्प्यात आंदोलन झाले .
याबाबत राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यवाह नरेंद्र वातकर ,यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे आदि तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मच्छिंद्र गुरमे यांनी सांगितले. 9 ऑगस्ट पर्यंत सरकारने अधिसूचना रद्द करावी अन्यथा 10 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे .या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, राजाराम खंदाडे, वनिता काळे, उदगीर तालुकाध्यक्ष तातेराव मुंडे रजनी जोशी उदगीर तालुका उपाध्यक्ष अतुल गुरमे
कांचनकुमार केंद्रे बस्वराज पाटील सर मंगेश सरदार दत्ता गुनाले किरण धोंडगे विजयकुमार मुंढे सदाशिव खुडे सुशील कुलकर्णी बालाजी पडलवार महिला आघाडी प्रमुख वैशाली मुस्कावाड लक्ष्मण बेंबडे गौरव येवळीकर आदी पदाधिकाऱ्यांनी अन्नत्याग करून आंदोलनात सहभाग घेतला