उदगीर प्रतिनिधी :-गणेश मुंडे
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा.शा.सुगाव येथे 14 व्या वित्त आयोगातून नूतनीकरण,रंग रंगोटी, मैदानात पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उदघाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.रेल्वेच्या प्रतिकृतीत या शाळेच्या आधुनिकीकरणाचे उद्घाटन अध्यक्ष केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.9 ऑगस्ट क्रांती दिनी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले कि,आम्ही सर्व पदाधिकारी उत्तम समन्वय साधून मा.संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.विविध प्रश्न सोडवत आहोत.आरोग्य खात्यामार्फत ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा पुरवत आहोत.शिक्षण विभागातील रिक्त पद पदोन्नती ने 4 दिवसात भरणार आहोत.आज सुगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या नवीन रंग रंगोटी,पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. शिक्षण हा जिल्हा परिषदेच्या प्राधान्याचा विषय आहे,जि.प.शाळेतून मिळणारे शिक्षण हे दर्जेदार असले पाहिजे.जि.प.शाळेत शिकणारा विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेत पुढे आला पाहिजे,असे ते उदघाटन प्रसंगी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी बोलताना व्यक्त केली.
उपाध्यक्ष भारतबाई सोळंके,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.या वेळी लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळंके,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,नळेगाव जि.प.सदस्यां धनश्रीताई अर्जुने,चेअरमन दगडू साळुंके,सुगाव चे सरपंच विष्णू कातपुरे,उप सरपंच काळे,बबनदादा मुदाळे, वैजिनाथ गिरी, सागर बिरादार,निलेश पेठे,परम पेठे,आदींसह गावकरी उपस्थित होते.