कंदलगाव ता. ५
तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कंदलगाव परिसरातील ओघळ ओसंडून वाहत असल्याने हूर गोंडाच्या ओढ्याचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. तलावाच्या दिशेतून येणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने सुरक्षित राहण्याचे आदेश ग्रामपंचायत कडून देण्यात आले आहेत.
संबधीत ओढ्याच्या पुलावरून कणेरी मठ, कोगील, गिरगावला जाणेसाठी रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. पाण्याचा वेग जास्त असल्याने सुरक्षा म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
फोटो = कंदलगाव हूर गोंडाच्या ओढ्यावरून धोकादायक स्थितीत वाहणारे पाणी.
( छायाचित्र - प्रकाश पाटील )