कंदलगाव ता. २
पाचगाव रस्त्यावरील प्रगती नगर परिसराला विजपुरवठा करणारा विजेचा डिपी मुख्य रस्त्याच्या कडेला आहे. या डिपीवर विजेचा लोड झाल्याने आज सकाळी त्या डिपीतून धूर येत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. हि माहिती तात्काळ त्यांनी पाचगाव येथील जीवन ज्योती रेस्क्यूचे फायटर संदिप गायकवाड यांना दिली.
गायकवाड यांनी विलंभ न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यां सोबत घटनास्थळावर गेले व तात्काळ विजपुरवठा बंद करून आग आटोक्यात आणली.
गेल्या तीन वर्षापूर्वी असाच प्रकार या पोलवरील डिपीमध्ये घडला होता. त्यामुळे नागरीकांतून भिती व्यक्त होत आहे.
फोटो -पाचगाव प्रगती नगर येथील डिपीतील आग विझवताना संदिप गायकवाड .