हातकणंगले / प्रतिनिधी
दि.२०
प्रशांत तोडकर
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने कोरोनाबाधित पत्रकारांसाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महामारीच्या संकटाशी भारतासह अवघे जग लढा देत आहे.या लढय़ामध्ये सरकार,प्रशासन,डॉक्टर्स,नर्स, पोलीस आदीच्या प्रमाणेच पत्रकारांची ही भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे.
पत्रकार पत्रकारिता करीत असताना काहींना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या पत्रकारांवर योग्य वेळी,योग्य उपचार होण्यासाठी पत्रकारांसाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
सदरचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे,उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील,कौन्सिल मेंबर सुरेश कांबरे आदींनी दिले.