कंदलगाव ता . ८ ,
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये . यासाठी मा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहन नुसार कंदलगाव शिवसेना शाखा व विराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि .८ रोजी आंबाबाई मंदिर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले .
सुमारे एकशे पंचवीस जणांनी रक्तदान केले यासाठी संजीवनी ब्लड बॅकेचे डॉ . प्रिती रजपुत व त्यांच्या स्टापचे सहकार्य लाभले .
यावेळी संजय पवार , विजय देवणे -शिवसेना जिल्हाप्रमुख, सुजीत चव्हाण - उपजिल्हा प्रमुख, विराज पाटील -शिवसेना करवीर तालुका प्रमुख , पापा निर्मळ , सुरेश पाटील , चंद्रकांत संकपाळ , अनिल सुतार , रोहन काटकर , योगेश यादव यांचे सह पि .टी.एम. तरूण मंडळ , शिवसेना शाखा कंदलगाव , गावातील सर्व तरुण मंडळे व त्यांचे सदस्य उपस्थित होते .
फोटो ओळ - कंदलगाव येथे शिवसेनेच्या रक्तदान शिबीरा वेळी जिल्हा प्रमुख संजय पवार , विजय देवणे , सुजीत चव्हाण , विराज पाटील व इतर .
( छायाचित्र _ प्रकाश पाटील )