कंदलगाव : ता .८
कोरोना विषाणू जागतिक महामारी मुळे सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत तरी या सुट्टीचा सदुपयोग सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, राजेंद्र नगर कोल्हापूर चे प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवित आहेत. कॉलेजच्या तृतीय वर्षातील महेश गोपीचंद कांबळे विद्यार्थ्याने नेहमी अभ्यास व विविध ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतला. नुकताच गवर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेचा विषय " भारतीय तरुणांचे कोरोणा काळातील योगदान" असा होता. त्याला कॉलेजचे प्रा. निलेश देसाई, गौरव गाडगीळ व रोहन माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनिल हारेर व संस्थेच्या सचिव सौ. शोभा तावडे यांनी केले.
फोटो - महेश कांबळे