उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील पांडुरंग विद्यालय कल्लुर येथील शिक्षक चंद्रदीप नादरगे यांनी आठ जुन हा जागतिक महाराज म्हणुन साजरा केला जातो या बाबत त्यांनी MH9 बरोबर चर्चा संवाद साधला असता 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो.जगातील 97%पाणी
महासागरामध्ये आहे.पण हे महासागराचे पाणी पिण्यायोग्य नसून खारट असते.आपल्या पृथ्वीवर पाच महासागर आहेत. 1)प्रशांत महासागर 2)अटलांटिक महासागर 3)आर्किटक महासागर 4) दक्षिण महासागर 5)हिंदी महासागर.जगातील बरेच लोक महासागरातून मिळणाऱ्या साधनांवर अवलंबून आहेत. महासागर हे मानवाच्या उपजीविकेचे एक चांगले साधन आहे. महासागरातील मासेमारीमुळे बऱ्याच लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
अलीकडच्या काळात लोकसंख्या खूप वाढल्यामुळे सागरी भाग खूप मोठ्या प्रमाणात दूषित झाला आहे. महासागर ही आपल्याला लाभलेली नैसर्गिक संपत्ती आहे.
त्याचे संरक्षण केले नाही तर महासागरातील जलचारांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्या संबंधी जनजागृती करणे आवश्यक आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती सांडपाणी, साबनयुक्त पाणी, सेंद्रिय, असेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळून गटारामार्फत नद्यात तर नद्यामार्फत थेट सागरात येत आहेत. त्यामुळे होणाऱ्या दूषित जलप्रदूषणाने सागरातील सजीवांचे प्रमाण घटत चालले आहे. सागरी भागाच्या निरीक्षणाअंती सागरी भाग अस्वच्छ आढळून आला. त्याचबरोबर पाण्यात काही पदार्थ मिसळतात तर काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात.आता अलीकडील काळात प्लास्टिकच्या प्रदुषणामुळे सागरावर एक नवं संकट ओढवलं आहे. प्लास्टिक हा अत्यंत घातक ठरणारा पदार्थ आहे.जमिनीत व पाण्यातही हा प्लास्टिक लवकर कुजत नाही. प्लास्टिक कॅरीबॅग,प्लास्टिक बॉटल पाण्यात तरंगतात.त्या वर्षानुवर्षे तश्याच टिकून राहतात.सागरामध्ये 100 ते 150 फुटापर्यंत प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण आढळून आले आहे.आत्तापर्यंत अमाप प्लास्टिक कचरा गावातून,शहरातून नद्यामार्फत थेट सागरापर्यंत पोहोचला आहे.त्याचबरोबर ई कचरा म्हणजे विजेवर वापरली गेलेली साहित्य परंतु त्यात ती नादुरुस्त झालेली उपकरणे म्हणजेच ई कचरा होय.यात फ्रीज, रेडिओ, इस्त्री,खराब वायर,सी.डी., डी.व्ही.डी.प्लेअर,कुलर,पंखे सर्व प्रकारचे संगणक,कॅलक्युलेटर,बॅटरी, की बोर्ड,माउस,मोबाईल,रिमोट घड्याळ,इलेक्ट्रिक वस्तू, इ.खराब वस्तू या कचऱ्यात समाविष्ट होतात. या सर्व वस्तूवरील प्लास्टिकचे आवरण आशा प्रकारचा कचराही समुद्रापर्यंत पोहचतोय.प्लास्टीक आता आपली गरज झाली आहे . प्लास्टिक खूप स्वस्त आहे आणि ते कुठेही आपणास सहज मिळणार आहे.त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर चालूच ठेवतो.त्यात प्लॉस्टिकच्या ,पाण्याच्या बाटल्या, खाऊचे डब्बे,बकीट,चमचे, प्लास्टिकच्या मणी,प्लास्टिकच्या वेगवेगळ्या खेळणी,ट्यूब लाईट्स, बल्बांचे काच तसेच हॉस्पिटलमधील स्लाईन,सुया,औषधी काची व प्लास्टिक बॉटल,गोळ्यावरील आवरण,एक्स-रे चे प्लास्टिक, इ. सर्व घातक कचरा समुद्रात आढळून आला.प्लास्टिक कचऱ्यामुळे मच्छिमारांच्या जाळयात मासे कमी प्लॅस्टिक कचराच जास्त मोठ्या प्रमाणात येत आहे.मासे मिळविण्यासाठी अधिकाधिक खोल सागरात त्यांना जावे लागत आहे.
या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला तर हानी पोहचतेच अशा कचऱ्यामुळे सागराचे पाणी तर खराब झालेले आहे.परंतु त्यातील बरेच सजीव या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन मरण पावले आहेत आणि त्याच्या मरणाने हे सागराचे पाणी अधिकच दूषित बनले आहे. या शिवाय आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्यही धोक्यात येऊ शकते.या सर्व कारणामुळे महासागरातील जलचारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.काही सजीव नष्ट होऊ लागले आहेत त्यामळे आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याची पृथ्वीरच विलेवाट लावणे गरजेचे आहे.गावातून,शहरातून हा कचरा या पावसाळ्यात नदीतून सागरापर्यंत जाऊ न देणे. त्यासंबंधी जनजागृती करणे हे देशातील तसेच जगातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.आज जागतिक महासागर दिनानिमित्य महासागराच्या संरक्षनाचे कार्य सर्वांनी हाती घेतले पाहिजे...!