अडचणीवर मात करत शेतकरी यांनी गाठले यश
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
मागील अडीच महिन्यापासून महाराष्ट्रात लाँकडाऊन असल्याने शेतकरी यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे.तसेच शेतीबरोबरच जोडव्यवासाय म्हणून दुग्धव्यवसाय,भाजीपाला,तुती,असे अनेक मार्ग अवलंबून आपला उदरनिर्वाह करत असतात. उदगीर तालुक्यातील चौंडी येथील शेतकरी बालाजी जिवनराव बिरादार या तरुण शेतकरी यांनी दिड एकर शेतामध्ये टरबूज टोबन करून लागवड केले,त्यानंतर टरबूजाच्या दोन ओळीमध्ये आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली. या दोन्ही पिकासाठी चांगली मेहनत करून दिड एकरात जवळपास 50 हजार रू खर्च केले. लाँकडाऊन काळात टरबूज विक्रीसाठी तयार झाले मात्र वाहतूकीबरोबर बाजारपेठ बंद असल्याने खराब होण्याची भीती होती परंतु परिस्थिती समोर हार न मानता दोन अँटो भाड्याने घेतले आणि गावोगावी जाऊन विक्री केली.
या विक्रीसाठी कृषी सहाय्यक डि.एस.केंद्रे यानी मोलाची साथ दिली.दिड एकर टरबूज व मिरचीचा.एकत्रित खर्च 50 हजार झाला ,त्यामध्ये बियांणापासून वाहतुकीपर्यंत झाला. टरबुजाने दिड एकरात जवळपास खर्च वजा जाता 1.75 लाखाचे उत्पन्न दिले. तसेच आंतरपीक म्हणून मिरची घेतली होती.त्यातून खर्च वजा जाता 75 हजार एवढे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे दिड एकरात आंतरपीक पद्धतीने टरबूज आणि मिरची या दोन आंतरपिकातून जवळ जवळ 2.50 लाख एवढे उत्पन्न घेऊन आजच्या कोरोनाच्या संकट काळात यशाचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे.सदरील उत्पन्न हे 70 ते 80 दिवसात घेतलं आहे.
मेहनतीच्या जोरावर शेतकरी मोठ्यात मोठ्या संकटाला तोंड देऊन यशस्वी होता येते असे दाखवून दिलं आहे. शेतीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाशी दोन करत कष्ट केल्यास यश दुर नसल्याचे असं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे बालाजी बिरादार हा तरुण इतर शेतकऱ्यांच्या साठी एक प्रयोगशील शेतकरी आहे.