साके ः (सागर लोहार)
साके ता.कागल येथील महायुतीची सत्ता असेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या सौ शिलाताई तानाजी चौगले तसेच उपसरपंचपदी अशोक केरबा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. केनवडे चे मंडल अधिकारी अरूण कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी प्रमुख उपस्थीत ,बाजीराव चैागले , ज्ञानदेव पाटील, नामदेव पाटील, होते.
यावेळी नुतन सरपंच ,उपसरपंच यांचा माजी सरपंच रघुनाथ पाटील,उपसरपंच सैा.सुनिता बाचणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य, धनाजी बाचणकर, शहाजी स.पाटील, मोहन गिरी, छाया पाटील,आंबुबाई पाटील, आक्काताई जाधव. तसेच एम.आर.बाचणकर, संजय निऊंगरे,ऋतिक चैागले, युवराज पाटील,विश्आवास पाटील आदी उपस्थीत होते.
स्वागत तेजस्विनी पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी शुभांगी पुरेकर यांनी मानले.