*खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले यांच्या पुढाकार*
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उदगीर तर्फे भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून शासकीय covid-19 रुग्णालयास रॅपिड टेस्ट युनिट साठी स्वॅब तपासणीसाठी AC लागतो. हे अडचण लक्षात घेऊन अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाचा अपव्यय टाळून सद्यस्थिती लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तपणे भरतभाऊ चामले यांनी दोन टनाची AC सदर दवाखान्यास भेट दिली.हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोणा योद्ध्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मंगेशेट्टी,तहसीलदार व्यंकटेश मुंढे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड,पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण,कोविड 19 सेंटरचे इन्चार्ज डॉ.हरिदास यांची उपस्थिती होती.
योवेळी उदगीर उपजिल्हाधिकारी प्रविण मंगेशेट्टी बोलताना भरतभाऊ चामले यांनी काळाची अडचण लक्षात घेऊन रॅपीड अँटीजन टेस्ट साठी AC भेट देऊन विधायक पद्धतीने नेत्याचा वाढदिवस साजरा केल्यामुळे खुप छान सामाजिक कार्य केले असे ते कौतुक केले.यावेळी कोरोणा योद्धे म्हणून डॉ.सतीश हरदास,डॉ.शशिकांत देशपांडे,डॉ.राणी कदम,डॉ.पवार मॅडम,डॉ.सौंदळे मॅडम,जळकोटे सिस्टर,सय्यद सिस्टर,विनोद निलंगे सेवक,शंकर बिरादार सेवक,तुकाराम केंद्रे वार्डबाॅय आदींचा सत्कार करण्यात आला.या वेळी बाबुराव आंबेगावे,बाळासाहेब नवाडे,बालाजी परगे,बालाजी चामले,भागवत चामले,सरपंच बापुराव बिरादार,जनार्दन शिंदे,युवराज कांडगीरे,राजू पाचंगे,पत्रकार बसवेश्वर डावळे आदीं उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार बाबुराव आंबेगावे यांनी मांडले.