कंदलगाव ता.२१,
चंद्राईनगर परिसरात गेल्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असून परिसरात एकाही गल्लीत गटारीची सोय नसल्याने वाढत्या रहिवाशी कॉलण्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे .
बेळगावकर कॉलणी, बाबर कॉलनी व चंद्राईनगर या तीन कॉलण्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने परिसरात डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे .नागरीकांचे आरोग्य बिघडण्याआधी ग्रामपंचायतने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
कोट- पुर्वीचा नाला खाजगी मालकाच्या हद्दीतून असल्याने गटारीचे पाणी सोडण्यास विरोध केला जात आहे.गटारीमंजूर आहेत.पण तांत्रीक आडचणीने थांबल्या आहेत.
फोटो . चंद्राई नगरमध्ये गटारी नसल्याने रस्त्यावर झालेली दलदल .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )