हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
सन २०१८ - १९ व २०१९ - २० या आर्थिक वर्षातील शासकीय -निमशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले कोरोनाच्या काळात सरसकट मंजूर करावीत . यासह अन्य मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री नाम . राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष व शिक्षकनेते दादासाहेब लाड ,पगारदार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर पाटील , अध्यक्ष सुनिल पाटील यांनी दिले .
यावेळी पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केलेबद्दल नाम . पाटील यांचे आभार मानले . नाम . पाटील यांनी शासन दरबारी वैद्यकीय बिलाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .
फोटो -
नाम . राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना निवेदन देताना शिक्षकनेते दादासाहेब लाड मनोहर पाटील , सुनिल पाटील .....