उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
कोरोना या महामारीमुळे शेतकरी यांना ही तोटा सहन करावा लागत आहे.या रोगाचा अनेक क्षेत्रावर परिणाम पडला असुन शेतकरी वर्गालासुद्धा मोठा फटका बसला आहे.पारंपरिक शेती सोडून प्रायोगिक शेत करण्यासाठी उदगीर तालुक्यातील वाढवणा (खु) येथील जवळपास विस शेतकऱ्यांनी तुती (रेशीम)या शेतीला प्राधान्य दिले. अनेक शेतकऱ्यांनी दोन एकर तर काही शेतकऱ्यांनी एक एकर वर तुतीची लागवड केली होती.काही शेतकऱ्यांना चांगला नफा सुद्धा मिळाला मात्र गेल्या चार महिन्यापासून कोरोना रोगाच्या प्रार्दुभाव वाढत असल्याने वाहतूक व्यवस्था बंद आहे.खाजगी वाहनाने जाण्यासाठी बाजारपेठा तेलंगाणा, जालना हे ठिकाण जवळ नाहीत.आणि ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही.त्यामुळे काढलेले कोसला घरातच सडुन गेला असल्याने शेतकरी खरीप हंगाम सुरू झाल्यावर तुतीला मोडून आपल्या पारंपरिक शेतीच्या माध्यमातून सोयाबीन,तुर या पिकांची पेरणी केली. शेतकऱ्यांनी तुती मोडुन सोयाबीन ची लागवड केली आहे.यावर्षी तुतीवर थ्रीप्स या रोगाचा ही प्रार्दुभाव झाला असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.अशा प्रकारे नागेश पाटील,राम पाटील,कानवटे राम,कानवटे जयवंत किरण भोसले,धोंडीबा कानवटे आदी शेतकरी तुतीला दुर करून नेहमी प्रमाणे सोयाबीन तूर ज्वारी आदी पिकाला पसंती दिली आहे.