Monday 13 July 2020

mh9 NEWS

एक सुशिक्षित नवउद्योजक ते मराठा समाजाचे माजी अध्यक्ष तसेच रोटरी क्लबचे प्रेसिडेंट 🚩

पट्टणकोडोली (साईनाथ आवटे) 

सन 1996 चा तो काळ आठवीत शिकणार पोरगं, सोबत पाठोपाट मागील  ईयत्तेत असणारा भाऊ, घरची परिस्थिती बिकट हलाखीची वडिलांचा चांदीचे दागिने बनवण्याचा व्यवसाय पण अचानक चांदी दरवाढी मुळे मंदिने ग्रासलेला.अशा परिस्थितीत शाळा शिकावी काय वडिलांना कामात मदत करावी या द्विधा मनस्थितीत काम करत करत 1997/98 एसएससी पास झाला पण पुढे काय?? एकिकडे कॉलेजचे रंगारंग जीवन खुणावत होते तर दुसरीकडे घरची परिस्थिती वडिलांना हातभार लावण्याची जाणीव करून देत होती. या युवकाने जबाबदारी स्विकरली वडिलांना साथ देत देत  2000 साली बारावी 2003 साली सायन्स शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पूर्णवेळ व्यवसायात वाहून घेतले.या कामी लहान भावाची मोलाची मदत लाभली. कोल्हापुरातील *मेसेर्स सुरेश & ब्रदर्स* यांनी त्याला अत्यंत विश्वासाने जवळ करत महत्वाची साथ दिली. मग मात्र या युवकांनी मागे वळून पाहिलेच नाही 2016 पर्यंत अत्यंत निष्ठेने व सचोटीने व्यवसाय करून स्थिरस्थावर झाल्यानंतर 2016 साली *श्रीमहालक्ष्मी ज्वेलर्स* फर्मची स्थापना केली. हे करत असताना अंगातील समाजसेवेची रग गप्प बसू देत नव्हती. आपल्याच दुकानातील कामगार हा मालक झाला पाहिजे अशी भावना मनात निर्माण झाली. या भावनेतून कामगाराला मालक बनवण्याची धडपड सुरू झाली. एकूण 17 कामगारांना मालक बनवले तसेच तिघांना सराफी दुकान घालून दिले. विशेष म्हणजे यापैकी कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत सर्व कामगार मित्र आहेत. हे करत असतानाच 2014 सली रोटरी क्लब ऑफ हुपरी जॉईन करुन खऱ्या अर्थाने समाजसेवेची कास धरली. सन 2017 साली गावातील युवकांना एकत्र करून स्वराज्य फाउंडेशनची स्थापना केली या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. सन दोन हजार अठरा मध्ये *"सकल मराठा समाज पट्टणकोडोलीच्या अध्यक्ष"* पदाची धुरा, अध्यक्षपदाची धुरा अत्यंत अनपेक्षितपणे खांद्यावर पडली ति त्यांनी जोमाने व निष्ठेने पेलली नुसती पेललीच नाही तर पट्टणकोडोली मराठा समाजाला नवसंजीवनी दिली.‌त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगले बदल समाजाने बघितले.मंदिरात उत्तम व्यवस्था ठेवली.लहाण मुलांना खेळण्यासाठी विविध साधने उपलब्ध केली.मंदिराच्या भव्य सभामंडपाचे काम पूर्ण केले.अर्थात या कामात त्यांना सर्व सहकाऱ्यांनी खुप मदत केली.अशा सगळ्या सामाजिक सेवाभावी कार्याची दखल घेऊन सकाळ पेपर्सनी सन 2019चा  मानाचा   *सकाळ उद्योगरत्न पुरस्कार* जाहीर केला.

अशा पद्धतीच्या प्रगतीच्या चढत्या आलेखावर त्यांनी कळस रचला तो म्हणजे त्यांनी सकल मराठा समाज पट्टणकोडोलीच्या *#अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली* पण त्यांच्या या निर्णयामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला दुःख झाले तसेच समाज बांधवही व्यतीत झाले.इतकेच नाही गावातील व परगावातील संबंधीत मित्र परिवार अचंबित झाले.अशा निर्मोही निस्वार्थी उद्योगशिल माणसाचे नाव आहे....
*मराठा समाजाचे माजी अध्यक्ष माननीय श्री.मच्छिंद्र पांडुरंग जाधव.* यांच्या सान्निध्यात काम करण्याचा योग आला हे आमचे भाग्य.अतिशय मनमिळाऊ,समजूतदार लाघवी स्वभावामुळे ते इतरांना क्षणात आपलेसे करून घेतात.त्यांना लहाणबंधु श्री‌.जालेंद्र यांची लाख मोलाची खुप छान साथ आहे तसेच सर्व कुटूंबाची सुद्धा.एकदा मंदिराच्या कामासाठी घरी गेलो असता त्यांच्या वडिलांशी (तात्या) बोलण्याचा मोका मिळाला. तात्यांना मी मच्छिंद्र यांच्या कामाच्या पध्दती विषयी वीचारले , तात्यांनी एका वाक्यात सांगितले *जगा आणि जगू द्या* आणि मी मच्छिंद्र जाधव यांच्या यशाचं गमक काय हे ओळखले. इतरांना सोबत घेऊन पुढे जायचं त्यांच्या सोबत आपला विकास.पि एम मोदिजींच्या शब्दांत सांगायचं झालं तर *"सबका साथ सबका विकास."* इथून पुढे सुध्दा समाज विकासात आपलं योगदान सुरू ठेवावे असे अपेक्षा,ते आम्हाला निश्चित साथ देतील यात शंका नाही.आणि आता हुपरी सारख्या शहरातील रोटरी इंटरनॅशनल क्लबचे प्रेसिडेंट पदाची धुरा अत्यंत जाणिवपुर्वक त्यांच्या खांद्यावर देताना जो विस्वास हुपरी आणि परिसरातील त्यांच्या मित्रपरिवाराने दाखवला तो मच्छिंद्र यांच्या आजवरच्या निस्वार्थी जनसेवेला मिळालेला मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. हि जबाबदारी ते उत्तम प्रकारे पार पाडतील. ईश्वराने त्यांना त्यांच्या कामात यशस्वी करावे अशी प्रार्थना.


शब्दांकन✍️ प्रशांत निकम ..🙏

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :

3 comments

Write comments
Unknown
AUTHOR
14 July 2020 at 01:47 delete

तुम्हचा सामाजिक कार्यास सलाम. तुम्हची व समाजाची अशी च प्रगती होवो हीच सदिच्छा.

Reply
avatar
Unknown
AUTHOR
14 July 2020 at 10:17 delete

मच्छिंद्र दादांच्या रोटरी क्लबमधील या नवीन प्रवासास मनापासून शुभेच्छा।।।।।।
यांचा मान इथून पुढे असाच वृद्धिंगत होत राहो अशी प्रार्थना!!!

Reply
avatar