हेरले / प्रतिनिधी
दि.10/7/20
मागील दोन वर्षात झालेल्या ऑन लाईन बदली प्रक्रियेत विस्थापीत होऊन गैरसोयीत गेलेल्या शिक्षकांची स्व: तालुक्यात बदली करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन शिक्षण समिती सभापती प्रविण यादव यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.
शिक्षक नेते मोहन भोसले यांचे नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्यावतीने प्रविण यादव व उपमुख्य कार्यकारी रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात आँनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षक बंधू भगिनींना १०० ते १५० कि.मी. लांबच्या शाळेवर पदस्थापना मिळालेली आहे. सध्याच्या कोराेना संकटकाळात शालेय कामकाजासोबतच कौटुंबिक स्वास्थही सांभाळण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे . कुटूबांपासून लांब असले तरी कोराेना योध्दा म्हणून सोपवलेली जबाबदारी शिक्षकांनी प्राणिकपणे पार पाडली आहे . या संकटकाळात कौटुंबिक स्वास्थ्यासाठी गैरसोयीत असलेल्या विस्थापित शिक्षकांची स्व: तालुक्यात बदली होणे आवश्यक असून सदर बदली प्रक्रियेत प्राधान्यांने महिलांची सोय करावी.विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती घेण्यात यावी . सर्व प्रकारची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होताच विषय शिक्षकांचे ऐच्छिक रिव्हर्शन व रिव्हर्शन नंतर विषय शिक्षक समायोजन बाबत विचार व्हावा, महिला शिक्षकांच्या ड्रेस कोड बाबत सर्व संघटनांच्या महिला प्रतिनिधींची बैठक बोलावून सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी वरील सर्व मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगून महिला ड्रेसकोड बाबत सर्व संघटनांच्या जिल्हा महिला प्रतिनिधींची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही ही सभापतींनी दिली.
आपल्या शिक्षण समिती कोरोना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना रू.१ लाख सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा ठराव केल्याबद्दल सभापती प्रविण यादव यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी संटनेचे नेते मोहन भोसले ,एन.वाय पाटील , सुनील पाटील , रघुनाथ खोत , जयवंत पाटील, सुनील चौगले , अरुण चाळके , सरदार पाटील, हेमंत भालेकर , अनिल डवरी , प्रभाकर गंगाधरे, महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील , संपदा चावरेकर, मीनाक्षी पोटले ,मीना चव्हाण , सविता येरूडकर ,प्रेमा डवरी,मनीषा चौगुले , योगीता कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर : शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना निवेदन देताना मोहन भोसले,एन.वाय.पाटील ,सुनील पाटील ,लक्ष्मी पाटील ,जयवंत पाटील व इतर