*नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) : - - - - -
* जगातील ८० देशांमधून सहभागी झालेल्या ७८०० विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी श्लोक प्रशांत जोशी युनिव्हर्सल परीक्षेत तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. मुळचे धुळे येथील रहिवासी आणि सध्या दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे वास्तव्यास असलेले अभियंता प्रशांत जोशी व सौ. पूर्वा जोशी या दाम्पत्यांचा चिरंजीव श्लोक जोशी ( वय १० वर्ष ) याने आपल्या बुद्धी कौशल्यातून यश प्राप्त केले युसीएमएएस अर्थात युनिव्हर्सल कन्सेप्ट इन मेंटल सिस्टम अंतर्गत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जगातील ८० देशातील ७८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात श्लोक प्रशांत जोशी यांने तिसरा क्रमांकाचा पुरस्कार चषक प्राप्त करून अव्वल स्थान पटकाविले. ऑनलाइन परीक्षेचे आव्हान स्वीकारून अवघ्या तीन मिनिटात शंभराहून अधिक गुण मिळवले. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.धुळे जिल्हा परिषदेचे निवृत्त आरोग्य अधिकारी पी. आर. जोशी तसेच नंदुरबार मर्चंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. पाठक यांचा श्लोक जोशी नातू आहे.