*
उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर अतिशय गंभीर परिस्थिती उदगीर शहरामध्ये तयार झालेली असताना उदगीर येथील covid-19 हॉस्पिटल मध्ये खूप साऱ्या गैरसोयी होत असून या सर्व गैरसोयी तत्काळ दूर करा नाहीत तर उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे लवकरच तीव्र आंदोलन. छेडले जाईल असा इशारा भाजपा पदाधिकारी यांनी दिला आहे
सविस्तर वृत्त असे की उदगीर येथील रुग्णालय कोव्हीड- 19 स्पेशल म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा खूप मोठा अभाव जाणवून येत आहे, सर्वात महत्त्वाची ऑक्सिजनची सेंटर लाइन ही अपूर्ण आहे, एक्स-रे मशीन उपलब्ध आहे परंतु त्याचा ऑपरेटर उपलब्ध नाही त्याच्यामुळे रुग्णांना बाहेरून एक्सरे काढून आणावा लागत आहे, म्हणून एक्स-रे मशीन धूळ खात पडली आहे,कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार पुरवठा होत नसून त्यांची राहण्याची व्यवस्थाही व्यवस्थित नाही तसेच एकच सामुदायिक स्वच्छतागृह त्यांना दिले आहे जे की फार चुकीचे आहे. दैनिक सकाळने याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी प्रशासनाला अशी विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर या सर्व गैरसोयी दूर करून रुग्णांची सोय करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा उदगीर शहराध्यक्ष ठाकूर यांनी दिला आहे,यावेळी त्यांच्यासोबत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे,उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,नगरसेवक मनोज पुदाले,जिल्हा मंत्री गणेश गायकवाड, शेहर सरचिटणीस पप्पु गायकवाड नगरसेवक दत्ता पाटील,नगरसेवक सावंन पस्तापुरे,नगरसेवक रामेश्वर पवार,भाऊसाहेब जांभळे अनुसूचित जाती अध्यक्षरविंद्र बेंद्रे शहर अध्यक्ष obc संतोष बडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.