सप्तर्षीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कवठेपिरान मातीत मारूती माने भाऊंंचा जन्म झाला . भाऊंनी कवठे पिरान गावात राहून हिंदकेसरी व आशियायी स्पर्धत एक सूवर्ण व एक रौप्य पदक देशासाठी जिंकले . खेडे गावात राहून एवढी मोठी कामगीरी करणारे हिंदकेसरी मारूती माने ( भाऊ ) यांची आज पुण्यतिथी .
सांगली पासून अवघ्या १२ किलो मीटर असणारे कवठेपिरान गाव .त्या वेळी सांगलीला जायला साधा रस्ता ही नव्हता .सन .१९६० ते ७० या दशकात कुस्ती मध्ये भाऊंंच्या नावाचे वादळ पूर्ण देशात घोगांवत होते .१९५८ मध्ये कराडच्या मैदानात आण्णा पाठोळे या नावाजलेल्या पैलवानाला आस्मान दाखवले आणि मारूती माने हे नाव लोकांना माहीत झाले .एका पाठोपाठ अनेक नामांंकित पैलवाना ना आस्मान भाऊ नी दाखवले .दिनकर दह्यारीकर . चंदगीराम .पै भिमसेन , मंहमंद हनिफ ' विष्णूपत सावर्डेकर व भाऊंं ची कुस्ती खासबाग मैदान तील अविस्मरणीय कुस्त्या आहेत . पावने तीन तास चाललेली कुस्ती मैदानात एक लाख लोक बाहेर व तेवढे च लोक तिकीट काढून बाहेर उभे होते.आत मुंगीलाही जागा नव्हती . ही कुस्ती भांऊनी जिकली .
१९६२ मध्ये भाऊ अशियायी स्पर्धेसाठी जकार्ता येथे गेले व तेथे त्यानी ग्रीक रोमी व फ्री स्टाईल प्रकारात एक सुवर्ण व एक रोप्य पदक जिंंकले व जर्काता वीर हा सन्मान मिळविला .१९६४ मध्ये पंजाब मधील कसाल येथे हे पदक जिकले हिदंकेसरी ची गदा मिळवली . कवठेपिरान सारख्या खेडे गावात राहून हिंदकेसरी झाले . त्या वेळ संपूर्ण महाराष्ट एका बाजूला व कवठे पिरान एका बाजूला अशी स्थिती होती .पुणे बेळगाव महाराष्ट्र येथून पैलवान तालीम करायला येत असत . साडेतिनशे पैलवान गावत होते . भाऊंची कुस्ती असेल तेव्हा गावात भाऊ कुस्ती जिंंकलेचेकळे पर्यत गावात चुली पेटवत नसत . एवढे गावचे भाउंच्यावर प्रेम व जीव होता .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांनी भाऊंंना राजकारणात आणले . आशिया खंडातील सर्वात मोठा शेतकरी सहकारी कारखान्याचे भाऊंना व्हा चेअरमन केले . त्यावेळी कारखानाचा नाव लौकी क वाढवला अनेक गोर गरीबाच्या मुलाना भाऊंंनी कारखान्यात काम दिले . तसेच सांगली जिल्हा मध्यवती बँकेचे पाच वर्षे अध्यक्ष होते . त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रंमाक मिळवून दिला .. कवठे पिरानचे पंचवीस वर्षे सरपंच तसेच गावात १९७० पासून गावात कोणतीच निवड नूक न होता गावात सर्व संस्था च्या निवड प्रक्रिया बिनविरोध होत आल्या आहेत . तिच पंरपरा त्याचे पुतणे पै . भिमराव माने यांनी राखली आहे . गावाने त्यांना साथ दिली आहे . याबरोबर सप्तर्षी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून गावात मुलीच्या शिक्षणाची सोय केली आहे . तसेच मुलांंच्या शिक्षणासाठी पन्नास लाख रूपये खर्च करून हिंदकेसरी मारूती माने विद्यालयाची इमारत बांंधून दिली आहे .
💐महाराष्ट शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार १९८०- ८१ .
💐 भारत सरकारचा मेजर ध्यानचंद जिवन गौरव 2००५ .
💐 महाराष्ट्र शासनाचा दलीत मित्र जिवन गौरव २००७ .
💐 फाय फाऊडेशन चे पुरस्कार
राज्य सभेवर खासदार
💐 महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद अध्यक्ष .
💐 आखिल भारतीय कुस्तीगार महासंघ कार्याध्यक्ष .
💐शासकीय परिषद सदस्य . तहयात .
असे अनेक मान सन्मान भाऊंना मिळाले आहेत अशा थोर व्यक्तीस विनम्र अभिवादन .
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व हिंदकेसरी मारुती माने या दोघां असामान्य व्यक्तींचा गरिबीतून उच्च पदावर ती गेलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीचा स्मृतिदिन एकाच दिवशी आहे.
स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही' असे अनेक प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडणारे डॉ.एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचा आज स्मृतिदिन. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती होते. 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले. कलामांना मिसाईल मॅन म्हणूनही विशेष संबोधले जायचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एक नावाजलेले आणि प्रसिद्ध वैज्ञानिकही होते. अशा असामान्य व्यक्तीमत्वाच्या हस्ते भाऊंना गौरविण्यात आले होते आणि दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी यावा हे विशेष