शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिनांक 14 /7 /2020 रोजी बिंदुनामावली तयार करण्यासाठी धडक मोहीम राबवून पूर्ण करावी असे असल्याचे पत्र काढले होते. सदरचे पत्र पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारे आहे सर्व 20% अनुदानित घोषित,अघोषित,प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यापूर्वीच मूल्यांकन करताना अनेक वेळा तपासणी करून अद्ययावत बिंदुनामावली तपासूनच मूल्यांकनात पात्र झालेले आहेत.
बिंदूनामावली शिवाय एकही शाळा अनुदानास पात्र झालेले नाही.
आता पुन्हा वेगळी तपासणी आदेश काढून शासन अनुदान देण्यासाठी वेळ काढत आहे का? चालढकल करत आहे?
शासन शिक्षकांच्या समस्या गांभीर्याने घेत नाही म्हणून सदर चे शासनाने काढलेले पत्र तात्काळ मागे घ्यावे अन्यथा सद्यस्थितीत असलेल्या कोरोना काळात सर्व नियम पाळत जनआंदोलनाचा प्रक्षोभ तयार होईल व उग्र आंदोलन करण्यात येईल
तरी सदरचे आदेश मागे घ्यावेत अशी विनंती.
शिक्षण उपसंचालकसो, कोल्हापूर.
तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारीसो, जि.प कोल्हापूर यांना निवेदन देऊन केली.
या वेळी महाराष्ट्र राज्य (कायम)विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर,सचिव प्रकाश पाटील, गजानन काटकर, भानुदास गाडे, रामराजे सुतार,उत्तम जाधव उपस्थित होते.