*दोंडाईचा --- ( वैभव करवंदकर ) - - - - -*
दोंडाईचा येथील शिंपी समाजातील प्रत्येक कुटुंबाने एकत्र न येता आपल्य घरातील सदस्यांनी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७० वा संजिवनी समाधी सोहळ्या निमित्त घरात प्रतिमा पूजन केले.
कोरोनाने घातलेले थैमान आणि दोंडाईचा शहरात लागू असलेल्या जनता कर्फ्यु मुळे सालाबादाप्रमाणे पालखी मिरवणूक सोहळा व भंडारा हे कार्यक्रम न घेण्याचे शहर कार्यकारिणीने जाहीर केले. प्रत्येक शिंपी बांधवाने आपापल्या घरी संत नामदेव प्रतिमापूजन व आरती करून साध्या पद्धतीने संजीवन सोहळा साजरा करण्यासाठी आवाहन केले.
तालुका अध्यक्ष श्री शरद पवार यांनी शिंदखेडा तालुका ( दोंडाईचा परिसर ) तर्फे संत नामदेव प्रतिमा आरास स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात प्रथम तीन क्रमांकांना बक्षीसे जाहीर केली आहेत
आरास स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शरद पवार , प्रा. प्रकाश भांडारकर , नामविश्व सह संपादक , पांडुरंग शिंपी , प्रसिद्धी प्रमुख, धुळे जिल्हा , श्री सुरेश बागुल , म.का.सदस्य यांनी प्रयत्न केले.