साके प्रतिनिधी ः सागर लोहार
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध संघटाना दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड करतात. त्यामुळे जंगलांची संख्या वाढण्यास मदत होते. पण फक्त वृक्ष लागवड करण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे संगोपणाची जबाबदारी देखील घेणे गरजेचे असून आज पर्यंत संस्थेमार्फत केलेल्या रोंपांची देखभाल चांगली केल्याने समृध्दी दुध प्रकल्पा प्रमाणेच या गायरानात देखील वृक्षांची संख्या वाढवणार असल्याचा ठाम विश्वास माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्त केला.
अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था साके,व्हनाळी,केनवडे गोरंबे या संस्थेमार्फत केनवडे येथील गायरान गटनंबरमध्ये आयोजित 500 वक्षांच्या लागवडी प्रसंगी ते बोलत होते.
सहाय्यक निबंधक संस्था कागल यांचे जा.क्र.127/वृक्षलागवड/उदिष्ठ सुचनेनुसार 500 झाडांचे वृक्षारोपण करणेचे उदिष्ठ देणेत आले होते त्यानुसार संस्थेच्या कमांड एरिया मधील मैाजे केनवडे गायरान मध्ये 500 रोपांचे वृक्षारोपण संस्थेचे चेअरमन मा.आम.संजयबाबा घाटगे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव आकाराम बचाटे, संचालक विष्णूपंत गायकवाड,साताप्पा तांबेकर,विश्वास पाटील,विलास पाटील,रघुनाथ पाटील,नामदेव पाटील, तुकाराम पाटील, अशोक पाटील आदी उपस्थीत होते.
फोटो ः केनवडे ता.कागल येथील गायरानात अन्नपुर्णा संस्थेमार्फत वृक्षारोपन करतांना मा.आम.संजय घाटगे, विष्णूपंत गायकवाड,रघुनाथ पाटील,आदी छाया ः रघुनाथ पाटील,गोरंबे