सैनिक टाकळी प्रतिनिधी
सैनिक टाकळी येथे वीर जवान स्मारकास अभिवादन करून कारगिल दिन साजरा करण्यात आला यावेळी सुरक्षित अंतर ठेवून माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅण्डल मार्च आयोजन केले होते .यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले भारतीय सैन्यांंची कामगिरी इतर कोणत्याही देशातील सैन्यापेक्षा सरस आहे . त्यामुळे भारतीय जवानांचा दबदबा जगामध्ये आहे. कारगील चा विजय सैनिकांचे मनोधैर्य वाढणार होता.आपल्या देशासाठी जवान व किसान दोघेही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत . यावेळी उपस्थित माजी सैनिकाने वीर जवान स्मारकास मानवंदना दिली .