माजगाव प्रतिनिधी:-
आज कोल्हापूर( कागल) येथे ग्रामविकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ यांचे निवास स्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (मा.आमदार कै . शिवाजीराव पाटील) शिष्टमंडळाने भेट घेतली . व या वर्षी थांबलेल्या बदल्या सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु केल्या बद्दल मा.ना.मंत्रीमहोदयांचे शिक्षक संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करणेत आले .
जिल्हापरिषद मधील शिक्षक संवर्ग वगळून इतर संवर्गाच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संवर्ग आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे आदेश लवकरात लवकर काढावेत . व अंतर जिल्हा बदलीचा चौथा टप्पा सुरु करावा आणि जिल्हांतर्गत बदल्या मध्ये विस्थापित व पती पत्नी यांच्या झालेल्या गैरसोयी दूर करुन बदली प्रक्रिया राबवावी अशा प्रकारचे शिष्टमंडळचे वतीने निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.
त्यामध्ये प्रामुख्याने बदल्यांचे सोयीचे धोरण राबविणे साठी समिती नेमली होती त्या समिती समोर सर्व संघटनानी मांडलेल्या सुचनांचा परिपूर्ण विचार करुन बदली धोरण तयार करुन राबविणेत यावे . असा आग्रह धरला .
यावेळी बोलताना मा .ना . हसन मुश्रीफ साहेब म्हणाले, "गेल्या दोन तीन वर्षामध्ये शिक्षकांच्या खूप गैरसोयीच्या बदल्या झालेल्या आहेत . मी या खात्याचा मंत्री झाले पासून माझ्या लक्षात आले आहे . शिक्षक सोयीत असेल तरच आपले काम व्यवस्थित करु शकतो याची मला पुरेपुर जाणीव असलेने शिक्षकामधील सर्व संवर्गाच्या बदली बाबतच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शासनाने समिती तयार केली आहे . संघटनानी केलेल्या सूचनांचा विचार करून कुणावरही अन्याय होणार नाही असे बदली धोरण तयार करण्याचे मी त्यांना सूचना दिल्या असून अगदी लवकर हे धोरण तयार होईल . व त्या प्रमाणे या महिन्याभरात बदल्या करण्याची शासनाची तयारी आहे . कोरोना संकटामुळे थोडं मागेपूढे होवू शकत . परंतू आता जी बदल्या करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे ती अजिबात थांबवली जाणार नाही ." असे स्पष्ट सांगितले .
या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील, राज्य सल्लागार बाळासो काळे, राज्यसरचिटणीस केशव जाधव, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक बँकेचे नुतन श्री . जी . एस . पाटील, व्हा . चेअरमन बाजीराव कांबळे, राज्य सल्लागार दि .रा.भालतडक, वसंतराव हारुगडे, लायक पटेल, तुकाराम कदम, विजय बहाकर, संघाचे कार्यकर्ते, आंतरजिल्हा बदली हवी टिम शिक्षक उपस्थित होते .