कंदलगाव ता .११ ,
वेळ सकाळी १०.३० ची पाऊस नसल्याने उन्हाची तिरीप पडली होती . इतक्यात एका तरूणाने मंडलीक वसाहत येथील तुलशी गॅस शेजारी वृध्द चक्कर येऊन पडल्याचे महापालिका कोवीड १९च्या टीमला सांगीतले . या टीममधील गौरव पाटील , कृष्णात वरुटे , वसंत मगदुम व संजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन त्या वृद्धास उचलून सावलीत घेतले व पाणी पाजून त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याना शब्द उच्चारता येत नसल्याने त्यांच्याशी जास्त बोलने टाळले . व काही वेळाने त्यांना बरे वाटतय असे समजल्यावर ते वृद्ध मार्गस्त झाले .
फोटो - मंडलीक वसाहत येथे रस्त्यावर चक्कर आलेल्या वृद्धाला मदत करताना महापालिका कोवीड १९ ची टीम .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )