हेरले / प्रतिनिधी
दि. ३o /७ /२०
हेरले हायस्कूल हेरले ( ता. हातकणंगले) येथील दहावीचा निकाल १००% टक्के लागला आहे.
कु.जुयेरा इलाई खतीब हिने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत( ९१.०० )टक्के गुण घेऊन विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकवला.गुणानुक्रमे इतर विद्यार्थी मध्ये द्वितीय कु.सानिका सुनील पाटील (९०.४० ) टक्के,कु. प्रणिता नंदकुमार जाधव (९०.४० ) टक्के, तृतीय कु कल्याणी सुरेश कराळे (८८.२० ) टक्के गुण मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने,मुख्याध्यापक आर. एस. पाटील आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वर्गाचे मार्गदर्शन लाभले