Sunday, 19 July 2020

mh9 NEWS

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने शासनाच्या योजनांमध्ये सहभाग घेऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा : खा.डॉ.हिना गावित


    रोटरी क्लब नंदनगरीचा पदग्रहण संपन्न
                                            
 *नंदुरबार ( वैभव करवंदकर  ) - - - - -*                                                                           
  नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना या जिल्ह्यासाठी असतात. या योजनांमध्ये रोटरी क्लब नंदनगरीने सहभाग घेऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावून जिल्ह्याचे नाव नवीन उंचीवर नेण्याचे आवाहन खा.डॉ.हिना गावित यांनी केले. रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या तिसर्‍या पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी डॉ.हिना गावीत बोलत होत्या. 

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, सौ.हेता जानी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट श्रीकांत इंदानी, असिस्टंट गव्हर्नर अनिश शाह, रोटरी नंदनगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, माजी अध्यक्ष प्रितिष बांगड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी प्रार्थनाने झाली. खा.डॉ.हिना गावित पुढे म्हणाल्या की, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सामाजिक कार्य चांगल्या प्रमाणावर आहे. त्यासोबत त्यांनी जिल्ह्याची प्रतिमा उंचावेल यासाठी आरोग्य, रोजगार व शिक्षण या क्षेत्रांमध्येही आणखीन भरीव कार्य करावे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात होते, मात्र रोटरी क्लब नंदनगरीचे सदस्य रस्त्यावर उतरुन आरोग्य जनजागृतीसह गरजूंना अन्नदान, जीवनावश्यक वस्तू, सेनिटायझर, मास्क वाटप आदी कार्य करत होते. अडचणीच्या काळात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने केलेली मदत अविस्मरणीय आहे. रोटरी नंदनगरी सोबत काम करण्यास आवडेल, असे प्रतिपादन खा.डॉ.हिना गावित यांनी केले.
या पदग्रहण समारंभात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर यांना रोटरी क्लब नंदनगरीच्या अध्यक्षपदाची तर मनोज गायकवाड यांना सचिवपदाची शपथ दिली. याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित व जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांना रोटरी क्लब नंदनगरीचे मानस सदस्यत्त्व प्रदान करण्यात आले. तर नवीन सदस्य म्हणून डॉ.गौरव तांबोळी, डॉ.स्वप्निल महाजन, प्रवीण पाटील, इकबाल शेख, आकाश चौधरी, दिक्षांत सारडा, अब्बास काटावाला, राकेश आव्हाड, जुझर बोहरी यांना रोटरी पिन लावून रोटरी क्लब नंदनगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी बोलतांना म्हणाले की, रोटरी क्लब नंदनगरीने अल्पावधीतच डिस्ट्रिक्ट ३०६० मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. येणार्‍या वर्षात देखील नंदुरबार जिल्ह्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करुन जिल्ह्यात रोटरी नंदनगरीचे नाव मोठे करावे. श्रीकांत इंदानी, प्रितिष बांगड, नागसेन पेंढारकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील नवनिर्माण संस्था, अस्तित्व फौंडेशन, श्री छत्रपती ब्लड फौंडेशन, जमीअत उलमा ऐ हिन्द या संस्थाचा तसेच रोटरी नंदनगरीच्या सदस्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ऑनलाईन व्हॉईस ऑफ नंदुरबार या गितगायन स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत रागिणी शिंदे(प्रथम), पार्थ घासकडबी(द्वितीय), महिमा वळवी(तृतीय) तर उत्तेजनार्थ म्हणून दीपक जाधव, रोहिणी पिंपळे, केतकी गोहिल यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. 
रोटरी नंदनगरीच्या या पदग्रहण कार्यक्रमात कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व खबरदारी घेण्यात आली होती. प्रातिनिधिक स्वरुपात मर्यादित रोटरी प्रतिनिधी कार्यक्रमात उपस्थित होते. तर कार्यक्रमात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची लेझर गनने तपासणी करण्यात येत होती. तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा उपयोग करण्यात येत होता. कार्यक्रमात मीटिंग कॉल टू ऑर्डर अनिल शर्मा यांनी तर फोरवे टेस्ट आकाश जैन यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण दाभाडे यांनी तर आभार सचिव मनोज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज पाटील, मनीष बाफना, दिनेश साळुंखे, रमाकांत पाटील, हाकिम लोखंडवाला, विवेक जैन, हर्षल पाटील, मुर्तुझा वोरा, इसरार सैयद, फकरुद्दीन जलगुणवाला, प्रवीण येवले, सॅमूवेल लवणे, ऍड.प्रेमानंद इंद्रजित, विनोद जैन, अपूर्व पटेल, महेंद्र झंवर, रवी नानकानी, दीपक सेवाणी, विजय मंगलानी, अभिजित जाधव यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :