हेरले/ वार्ताहर
अमर थोरवत
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये ' एक गाव एक गणपती ' संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करावा . तसेच गावामध्ये गोरगरिबांना शिधावाटप अथवा गावामध्ये जे स्पर्धा परिक्षा करु इच्छिते आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीरे भरवावी असे मत शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी व्यकत केले.
ते मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीप्रसंगी बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच काशीनाथ कांबळे होते .
सपोनि भोसले पुढे म्हणाले की , गावामध्ये सामाजिक उपक्रम म्हणून कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करावी , तसेच रक्तदान शिबीर , स्पर्धा परिक्षा सारखे उपक्रम राबवून साधेपणाने गणेश उत्सव साजरा करावा त्याचप्रमाणे शाडूच्या मातीचा एक ते दीड फुट उंचीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा करावी , या वेळी गावातील विविध तरुण मंडळांनी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ' एक गाव एक गणपती ' यासाठी एकमुखी निर्णय घेतल्याबद्दल सर्व मंडळांचे आभार मानले .
यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अतुल लोखंडे , अविनाश पोवार , उपसरपंच सुभाष आकिवाटे , ग्रा.पं. सदस्य अवधूत मुसळे , अविनाश पाटील , शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , भाजपा चिटणीस आनंदा थोरवत , तानाजी गोरड , अमोल झांबरे , सुनिल खारेपाटणे , जयदीप रजपूत , शब्बीर हजारी , मोहरम उत्सव समितीचे उस्मानगणी मुल्लाणी ,दिलावर मुल्लाणी , आमीरहमजा हजारी , शकील मुल्लाणी , आदीसह गणेश उत्सव व मोहरम समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
फोटो
मौजे वडगाव: सपोनि किरण भोसले यांना एक गाव एक गणपती आयोजनाचे पत्र देतांना सरपंच काशिनाथ कांबळे शेजारी पीएसआय अतुल लोखंडे उपसरपंच सुभाष आकिवाटे