नंदगाव प्रतिनिधी : नंदगाव (ता - करवीर ) येथील युवकांनी लॉक -डाऊन च्या काळात समाजासमोर एक वेगळा आर्दश घालून दिला आहे . स्मशान म्हंटल्यावर अनेकांच्या पोटात भितीचा गोळा उठतो पण हीच स्मशानभुमी स्वच्छ करण्याचे तरूणांनी ठरवले . १९९४ सालचे दहावीचे वर्गमित्र एकत्र आले व त्यांनी स्मशान भुमी जवळील वाढलेली झुडपे , गवत , अंत विधीसाठी वापरून शिल्लक राहीलेले साहीत्य , कचरा काढून स्मशान परिसर , स्मशान शेड . स्वच्छ केले , व त्या ठिकाणी वृक्षारोपन केले . त्यांचे हे कार्य वर्गमित्र म्हणजे फक्त रस्सा मंडळ म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे . त्यांच्या या श्रमदान सुरू असतानाचे फोटो सोशल मिडीयावर आले .व ते पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत मा . जि .प . सदस्य अनिल ढवण , तसेच नंदगावच्या तलाठी वासंती पाटील कृषी सहाय्यक पी .एस . शिंदे यांनी तिथे जावून नंदगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले. या तरुणांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक नंदगाव व परिसरातील ग्रामस्थांच्याकडून होत आहे .