गांधीनगर प्रतिनिधी
गडमुडशिंगी तालुका करवीर येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे गांधीनगर, चिंचवाड , वळीवडे
उंचगाव या सभोवतालच्या गावांमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गडमुडशिंगी मध्ये मात्र बराच का संसर्ग थोपवण्याचा प्रयत्नांना आज गांधीनगर कनेक्शन मुळे खीळ बसली कारण दोन्ही कोरोना संसर्गित रुग्ण हे गांधीनगर ची संबंधित असून यामध्ये एका 18 वर्षीय मुलगीचा समावेश आहे. सदरची मुलगी गांधीनगर येथे कामासाठी जात होती कोरणा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तीन दिवसापूर्वी तिला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
ग्राम दक्षता समिती कडून आत्तापर्यंत कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. शाहूनगर वसाहतीमध्ये फवारणी करण्यात आली असून बाधित क्षेत्र प भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला आहे. यापुढे आणखीन जबाबदारीने काम करीत१०० टक्के संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरपंच जितेंद्र यशवंत व उपसरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.